मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभुराज देसाई यांनी नाव न घेता केला आहे.शिवसेनेचे आमदार वारंवार याबाबत उद्धव ठाकरेंना सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही, असं ही त्यांनी म्हटलं आहे.
शंभुराज देसाई म्हणाले, आमचे अनेक नेते सांगतात की, कोणीतरी उद्धव ठाकरेंच्या जवळ असणाऱ्या मोठ्या व्यक्तीनं शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षात दिसून आले आहेत. शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार एका बाजूला गेले आहेत. हा ट्रेन्ड हळूहळू खालीपर्यंत जाणार आहे.
पण या आमदारांचं का बरं ऐकलं गेलं नाही? कुणाच्या सल्ल्यामुळं ऐकलं गेलं नाही? कोणाच्या सांगण्यामुळं ऐकलं गेलं नाही? नेत्यांनी आता हा विचार केला पाहिजे की, हे ४० लोक आपल्याला जे सांगत होते त्यात आता तथ्य आढळून आलं आहे, असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

