• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पोटात गोळा; बदल्यांसाठी दिलेला ‘मलिदा’ पाण्यात जाण्याची धास्ती..!

Admin by Admin
June 24, 2022
in मंत्रालय
1 min read
0
प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पोटात गोळा; बदल्यांसाठी दिलेला ‘मलिदा’ पाण्यात जाण्याची धास्ती..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या विशेष प्रतिनिधी : सोमवारी रात्रीपासून राज्यात एकनाथ शिंदे यांनी सरकारविरोधात बंड केल्यामुळे राज्यातील काही प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पोटात गोळा आला आहे. काही प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्या आहेत. या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. खासकरून पुणे जिल्ह्यात व परिसरात आवडती पोस्टिंग मिळविण्यासाठी पन्नास लाखांपासून ते तीन कोटी रुपयांपर्यंत बोली लागल्याची चर्चा प्रशासकीय वतुर्ळात आहे.

बर्‍याच अधिकार्‍यांनी मंत्रालयापासून ते मंत्र्यांच्या जवळच्या हस्तकापर्यंत मोठ्या रकमा ‘अ‍ॅडव्हान्स’ दिल्या आहेत. आता सरकार अस्थिर झाल्याने आपण दिलेले पैसे बुडणार, या भीतीने काही प्रशासकीय अधिकारी मोठ्या ‘टेन्शन’मध्ये आले आहेत. पुणे जिल्हा आणि परिसरात महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क या विभागात पोस्टिंग मिळविण्यासाठी राज्यभरातील प्रशासकीय अधिकारी कायम प्रयत्नशील असतात. कितीही पैसे मोजावे लागले, तरी आपल्याला या परिसरात चांगली खुर्ची मिळावी म्हणून काही मोजके अधिकारी कोटीच्या घरात रकमा देतात.

सन 2022-23 च्या वर्षात 30 मेपर्यंत बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु, 27 मे रोजी महाविकास आघाडी सरकारने शासन निर्णय काढत 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत, असा निर्णय घेतला. त्यामुळे मागील महिन्यात होणार्‍या बदल्या अचानक रखडल्या, 20 जूनला विधानपरिषद मतमोजणी झाल्यानंतर राज्यात सत्तांतराचा घोळ सुरू झाला आहे. त्यातच तुमचे पैसे बुडणार नाहीत. बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत हा शासन निर्णय रद्द होऊन बुधवारी दुपारीच राज्यातील सर्व बदल्या होतील, असा सांगावा मंत्रालयातून काही प्रशासकीय अधिकार्‍यांना देण्यात आला होता.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या शासन निर्णयावर काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आपले पैसे बुडणार, या भीतीने अधिकार्‍यांच्या पोटात अक्षरशः गोळा आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यास ज्या अधिकार्‍यांनी आता पैसे मोजले आहेत, त्यांचे पैसे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर जे अधिकारी भाजप नेत्यांच्याही संपर्कात असतात, त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला
मिळत आहे.

Previous Post

पैशांचा पाऊस पाडणारा ‘बादशहा’..! भोंदूबाबासहित सात जणांवर गुन्हा दाखल : १५ लाखांची फसवणूक..

Next Post

“शिवसैनिकांना जयंत पाटलांनी त्रास दिला, पोलिसांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवले : आमचं बंड राष्ट्रवादीशी.”- जिल्हाप्रमुख आनंदराव पवार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“शिवसैनिकांना जयंत पाटलांनी त्रास दिला, पोलिसांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवले : आमचं बंड राष्ट्रवादीशी.”- जिल्हाप्रमुख आनंदराव पवार

"शिवसैनिकांना जयंत पाटलांनी त्रास दिला, पोलिसांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवले : आमचं बंड राष्ट्रवादीशी."- जिल्हाप्रमुख आनंदराव पवार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group