• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत जोरदार पावसाने रस्त्यावरच साचले तळे

Admin by Admin
May 21, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत जोरदार पावसाने रस्त्यावरच साचले तळे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज शहर आणि ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शुक्रवारीदेखील सुरूच होता. पावसाच्या संततधारेमुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

त्यामुळे शहरात दैना उडाली आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण असले तरीही वातावरणात उष्मा जाणवत होता. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍याला सुरुवात झाली. काही वेळातच जोराचा पाऊसही सुरू झाला. या पावसामुळे शहरात रस्त्यावरून पाणी पळत होते.

अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे लोकांची चांगलीच धावपळ झाली. शहरवासीयांना या पावसाने मात्र गारवा दिला. गुरुवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. शुक्रवारीही दिवसभर संततधार सुरूच होती. या पावसाने मालगाव रस्ता, समतानगर यासह विविध भागात पाणी साचले होते. त्यामुळे पाणी साचलेल्या रस्त्यातून ये -जा करणार्‍यांना त्रास झाला.

काही ठिकाणी रस्ते न झाल्याने चिखल साचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम तीन दिवसांपूर्वी सुरू झाले होते. आता पावसामुळे हे काम पुन्हा बंद झाले आहे. या रस्त्यावर पूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. या रस्त्यावर चिखल झाला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना त्रास होत आहे. मालगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच रस्त्यावरील तोडकर गिरणी जवळही पाणी साचले आहे. या पावसामुळे मिरजेतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Previous Post

जिल्ह्यातील १०७ गावात यंत्रणा सज्ज ;जि.प. चे सीईओ जितेंद्र डुडी हे काय करणार ,वाचा सविस्तर..!

Next Post

बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन ‘परिवर्तन’!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन ‘परिवर्तन’!

बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन ‘परिवर्तन’!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group