• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ११ वाहनांवर आरटीओची दंडात्मक कारवाई!

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

क्षमतेपेक्षा अधिक मुले शाळेसाठी नेआण करणार्‍या वाहन धारकाविरूध्द व अवैध शालेय विद्यार्थी वाहतुकीला आळा घालण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारी मोहिम राबवून ११ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तपासणी मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याचे उप प्रादेशिक अधिकारी प्रसाद गाजरे यांनी सांगितले.

सध्या शाळा सुरू असून शाळेतील विद्यार्थ्यांची नेआण करण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो. या वाहनात बहुसंख्यवेळा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले जातात. याची दखल घेत परिवहन विभागाकडून एका पथकाद्वारे आज तपासणी मोहिम राबविण्यात आली.

श्री. गाजरे यांनी सांगितले, अपुर्‍या कागदपंत्रासह नियमबाह्य अवैध शालेय विद्यार्थी वाहतुक करताना अधिक विद्यार्थी घेणे, सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारे बेकायदेशीर शालेय विद्यार्थी वाहतुक करण्यार्‍या वाहनाच्या विरोधामध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालच्यावतीने यापुढे ही तीव्र स्वरुपात कारवाई करण्यात येणार आहे.

मुलांचा शाळाप्रवास सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर पालक आणि शाळांचीही संयुक्त जबाबदारी आहे. किरकोळ आर्थिक फायद्यासाठी किंवा सोयीसाठी मुलांच्या जिवाशी खेळ करू नये. वाहन अधिकृत आहे का तपासावे. आपल्या पाल्याला ज्या वाहनातून शाळेत पाठवता, त्या वाहनाला आरटीओचा स्कूल बस म्हणून अधिकृत परवाना आहे का, याची खात्री करावी. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली शालेय परिवहन समिती अंतर्गत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीबद्दल वेळोवेळी दरमहा बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा.

प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीने अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करण्यार्‍या वाहनांना आवारात बंदी करावी. ज्या खाजगी व्हॅन, रिक्षा किंवा बस चालकांकडे शाळा वाहतुकीचा अधिकृत परवाना नाही, त्यांना शाळेच्या आवारात किंवा गेटजवळ विद्यार्थी सोडण्यास व नेण्यास मज्जाव करावा. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी पालक-शिक्षक संघात चर्चा करून पालकांच्या सभेत शाळा वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर ठेवून पालकांचे प्रबोधन करावे. शाळेच्या बस किंवा वॅनमध्ये विद्यार्थिनी प्रवास करत असतील, तर नियमानुसार महिला मदतनीस असणे अनिवार्य करावे असे आवाहन श्री. गाजरे यांनी केले आहे.

Previous Post

लग्नाच्या आमिषाने महिलेची दहा लाखाची फसवणूक

Next Post

ट्रान्स्पोर्टची १० लाखांची फसवणूक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

ट्रान्स्पोर्टची १० लाखांची फसवणूक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group