• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | कवठेमहांकाळ येथे कोंगनोळी येथील तरुणावर चाकू हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Admin by Admin
November 12, 2025
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | कवठेमहांकाळ येथे कोंगनोळी येथील तरुणावर चाकू हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कवठेमहांकाळ शहरातील उपकोषागार कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी मोहसीन दस्तगीर जमादार (वय ३७, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास आठ वाजता फिर्यादीचा भाऊ मन्सूर, त्याची पत्नी साईशा, फिर्यादीची पत्नी करिष्मा, तसेच राहुल कांबळे व त्याची पत्नी अनिशा यांनी सलगरे येथे फिर्यादीच्या भावास केलेल्या मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.

यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा अतुल जगन्नाथ कांबळे (रा. कोंगनोळी) याच्या सांगण्यावरून संशयित आरोपी रवी खत्री, प्रदीप मोरे, लोकेश नाईक, महादेव भंडारी, सोमनाथ डवरी, साहिल डफेदार, सत्तार महात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीच्या भावास अतुल कांबळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यास तक्रार करण्यास सांगितल्याचे कारणावरून रवी खत्री व त्याच्या सोबत असलेल्या व साथीदारांनी फिर्यादीस हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. रवी खत्री व प्रदीप मोरे यांनी त्यांच्या कमरेस असलेला चाकू बाहेर काढून आता याला जिवंत ठेवायचे नाही, असे म्हणून रवी खत्री याने फिर्यादी भावाच्या पोटात व प्रदीप मोरे यांनी डावी बाजूस काखेजवळ बरगडीत चाकूने भोकसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.

Previous Post

डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची AK-47, कोण आहे ‘ही’ भयंकर महिला?

Next Post

सांगलीतील खळबळजनक डबल मर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट! हल्लेखोर शाहरूखची हत्या नव्हे तर मृत्यू, सीसीटीव्हीमुळे उलगडलं रहस्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील खळबळजनक डबल मर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट! हल्लेखोर शाहरूखची हत्या नव्हे तर मृत्यू, सीसीटीव्हीमुळे उलगडलं रहस्य

सांगलीतील खळबळजनक डबल मर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट! हल्लेखोर शाहरूखची हत्या नव्हे तर मृत्यू, सीसीटीव्हीमुळे उलगडलं रहस्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group