• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

१० नोव्हेंबरनंतर आचारसंहिता? राज्य निवडणूक आयोगाची उद्या बैठक; राज्यातील विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार ‘या’ मुद्द्यांची माहिती

Admin by Admin
October 29, 2025
in राजकीय
1 min read
0
१० नोव्हेंबरनंतर आचारसंहिता? राज्य निवडणूक आयोगाची उद्या बैठक; राज्यातील विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार ‘या’ मुद्द्यांची माहिती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १० नोव्हेंबरपूर्वी जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी (ता. ३०) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली आहे.

अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील १० दिवसांत निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा पहिला टप्पा होईल. त्याबरोबरच २८९ नगरपालिकांचीही निवडणूक घेता येईल का, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांची निवडणूक होणार हे निश्चित आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळ व ईव्हीएम आणि मतदार याद्यांवरील हरकती व त्यावरील तोडगा, अशा प्रमुख बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेता येईल हे निश्चित होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करणार आहे. ही कार्यवाही ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पण, त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, असे देखील राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

इस्लामपूर नगरपालिकेसाठी राजकीय हालचाली गतिमान; अजित पवार गटाकडे पहिल्याच दिवशी २१ जणांची उमेदवारीची मागणी

Next Post

सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास

सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group