खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरातील स्टेशन चौक परिसरातील रिक्षा चालकांनी हप्ता मागणी करणाऱ्या दोन संशयितांना जोरदार चोप दिल्याने स्टेशन रोडवर सायंकाळी ६ वाजता एकच गर्दी दिसून आली.
सविस्तर माहिती अशी की, शहर बसस्थानकाला लागून असलेल्या रिक्षा स्टॉपवर नशेखोर दोन संशयित युवक हे म्हाडा कॉलनी येथे जाण्यासाठी आले. त्यांनी रिक्षात बसण्या अगोदर म्हाडा कॉलनी येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यांना रिक्षा चालकाने ७० रुपये भाडे होत असल्याचे सांगितले. भाडे ऐकून नशेखोर दोन्ही युवकांनी रिक्षाचालकाला भाडे आम्ही देणार नाही, या स्टॉपवरच्या सगळ्या रिक्षावाल्यांनीच आम्हाला हप्ता द्यावा लागतो, असे म्हणत दमदाटी करून तिथून पळ काढला.
रिक्षा चालकांनी संशयित दोघांचा पाठलाग केला. परंतु पसार होत दोघेही रेल्वे स्टेशन रस्त्यावरील एका दारू दुकानात लपून बसले. रिक्षा चालकांनी गर्दी करत त्यांना दुकानातून बाहेर ओढले आणि चोप दिला. चोप देताना स्टेशन रोडवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


